Thursday, February 11, 2010

मोगरा : अजय अनंत जोशी

रंगलास तू खुडून मोगरा
लपविलास तू म्हणून मोगरा
भाळले गुलाब शेकड्यावरी
माळला तुला बघून मोगरा रंग
उधळलेस तू कितीतरी पांढरा असे
अजून मोगरा घेतला गुलाब,
बोचलाच तो नेमका तिथे हसून
मोगरा पाहतो नभात रंग केवढे
एकटाच सावरून मोगरा काळजात
प्रश्न एवढाच की, बोचला कसा...
असून मोगरा ? वाट वाकडी किती
पहायचा जायचा किती सुकून
मोगरा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment