खोटे असते हळहळणे खरे आतले
मळमळणे कधीच मी सोडून दिले
तुझ्यावाचुनी तळमळणे सहन कसे
मी करू प्रिये.. फुकट कुणाचे
सळसळणे ? मीठ असो किंवा साखर
दुधात असते विरघळणे बातमी तशी
खोटी, पण... पाहिले तुझे कळवळणे
तारका जिथे चमचमल्या दिसे
तुझेही घुटमळणे तुझ्याबरोबर
फुलूनही.. जमले नाही फळफळणे
जीवन झिजले पदोपदी उगाच
नव्हते भळभळणे गूण कोणता
आवडला ? उथळपणा? की खळखळणे ? डंख
मार तू एखादा नको तुझे ते
वळवळणे सोड नुसतेच हिरवळणे
देतो माझे दरवळणे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, February 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment