*रस्ता भरलेला असतो नि गर्दी
वाढत असते* रस्ता भरलेला असतो
नि गर्दी वाढत असते ढकलाढकली
करून कोणी ,समोर धावत असते
उगीच आशा असते की तो कधीतरी
दिसेलही त्याच्या भेटीची
इच्छा मग ,दिवसभर छळत असते तो
तसाच बोलत असतो मी अपुली ऐकत
असते (बाहेर बर्फ आत चहाचे ,
पाणी उकळत असते) दिसले सुखरूप
घर तरीही कायम मनात मी ते-
कुठले कोल्ह्याच्या पायांचे ,
ठसे आठवत असते? नको कुणाशी ओळख
आता आणि नको मैत्रीही जरा तुझा
पत्ता इमेल दे, ती फक्त म्हणत
असते कपाटभर कपडे असूनही
समाधान ते नाही... श्रीमंतीचे
हे पॅकेजच ,मुळी झगमगत असते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1893
Sunday, February 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment