Monday, February 15, 2010

तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा : सोनाली जोशी

*/तुला बोलावतो सागर तुला
बोलावती वाटा/* *तुला बोलावतो
सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी
अंतर कधी लाटा तुझ्या माझ्या
म्हणे झाल्या कधी गप्पा
जिव्हाळ्याच्या कुठे ती ऊब
गेली.. का असा केलास बोभाटा?
फुलांना त्रास मी नाही दिला ना
बोललो काही कशाचा दंश झाला मज?
...कुणी हा टोचला काटा.. जरा ऐकून
तर घे ना म्हणे म्हणणे कुणाचे
तू.... (तसे केले कधी मी तर कुणी
फोडायचा फाटा? इथूनच बघ उद्या
होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात
,आठवणीत हा फाटा मिषाने या
उधाणाच्या किती झाडे बहकलेली
......... उडाला ठिकठिकाणी दूर
पाचोळाच उफराटा!*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1921

No comments:

Post a Comment