रस्ता भरलेला असतो अन गर्दी
साचत असते जहरील्या
फुत्कारांनी हे विश्वच तापत
असते ही ओळख नको कुणाशी
मैत्रीही नकोच आता दे इमेल,
फोन व पत्ता ती नुसती बोलत
असते तो तसाच बोलत असतो मी
केवळ ऐकत असते बाहेर बर्फ अन्
मागे आधणही वाजत असते नेहमीच
कसे विरोधी येतात विचार मनी
ह्या मी रस्ता घडवत असते मी
रस्ता अडवत असते हे उन्हात
छाया देते थंडीत ऊबही देते या
झाडामध्ये बहुधा आईही राहत
असते तेच ते विचारत बसतो,
चौकशा किती ह्या करतो (टोचले
असे कापड की तग शिल्लक राहत
असते?) एकट्या अबोल कळीवर
भुंग्यास बघितले म्हणजे
भेटावे तू ही इच्छा या मनास
जाळत असते -सोनाली जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1940
Friday, February 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment