Friday, February 26, 2010

बघ तुझे माझे बिनसले शेवटी : बेफिकीर

फार ते चिकटून बसले शेवटी सर्व
काटे मी उपसले शेवटी मी तरी
सांगायचो.... माझीच हो बघ तुझे
माझे बिनसले शेवटी साधले नाही
चुका काढायला प्रेमही ठरवून
रुसले शेवटी ओळखी
रस्त्यातल्या रस्त्यामधे पण
मनापासून हसले शेवटी जे
स्वतःलाही कधी टाळायचे ते
मलासुद्धा तरसले शेवटी केवढी
विरहामधे क्षमता तरी... केवढे
श्रावण बरसले शेवटी गोड
आरंभात नाते वाटते मागुनी
होतेच असले शेवटी राहिली
अर्धी कथा माझी तुझी सांग ना
मग कोण फसले शेवटी? भूक
भागवतील गझला आपल्या धन जरी
अगदीच नसले शेवटी 'बेफिकिर'
जगलो प्रतिष्ठेने तसा काय
कसले, काय कसले शेवटी.....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1939

No comments:

Post a Comment