*आभास मीलनाचा..* केंव्हा तरी
कशाचा हलकेच भास झाला आभास
मीलनाचा पळभर मनास झाला
शून्यात पाहतांना हळुवार
लाजली तू दृश्यात मी असावा,
माझा कयास झाला तू लांब
दूरदेशी, ना रूप जाणतो मी
मुर्ती मनी तरळली, कलिजा खलास
झाला पाडातल्या फ़ळांना का आस
पाखरांची येता थवे निवासा, मग
मेळ खास झाला विरहात
वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता
बघता तया विलापा पक्षी उदास
झाला प्रेमा सदा भुकेली उर्मी
विलसित माया निष्काम ज्या
उमाळा तो प्रेमदास झाला
गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1931
Saturday, February 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment