वागतो आहोत वादळ पूर्ण
शमल्यासारखे भासतो आहोत आपण
छान रमल्यासारखे भांडणे
डोळ्यांमधे येतात लाटांसारखी
ओठ भासवतात पण सागर
नरमल्यासारखे
एकमेकांच्याविना ताजेतवाने
एरवी भेटतो आलिंगनी नुकतेच
दमल्यासारखे एकमेकांना चुका
माहीतही नसतात पण चेहरे
सवयीमुळे होती वरमल्यासारखे
हावभावातून नात्याची शिसारी
सांडते आणि मुद्दे मांडले
जातात नमल्यासारखे मीलनाची
सांगता होईल तेव्हा भासणे.......
मी करमल्यासारखे... तूही
करमल्यासारखे टाळण्यासाठी
उखाणा..... झुकविणे खाली नजर आणि
भासवणे जगाला तू
शरमल्यासारखे रोज अनुभवतो
तुझे ... माझ्यासवे... लोकांमधे
'बेफ़िकिर' गंधाळणे हे.. प्रेम
जमल्यासारखे टीप - जमीन चित्त
यांच्या 'राहिले माझे तुझे
नाते' या गझलशी मिळतीजुळती
आहे. मात्र 'रमल्यासारखे' हा
मतल्यातील मिसरा सुचल्यानंतर
रचलेली गझल आहे हे नमूद करणे
मी आवश्यक समजतो. तसेच, ही फ़क्त
तांत्रिकच तुलना आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1933
Monday, February 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment