.......................................... माझ्या कुशीत
...! .......................................... माझ्यासवे
निवांत बोलणार आज मी ! माझा
नवाच अर्थ शोधणार आज मी ! वेडा,
खुळा असेन, मी असेन बावळा...
तुमच्या सभेत खास शोभणार आज मी
! आलास तावडीत आज तू बरा मना ...
आता तुला तसा न सोडणार आज मी !
काढू पुन्हा तुझा कशास मी
खुजेपणा ? माझीच रेष उंच ओढणार
आज मी ! डोळ्यांत दाटतात
कोरडीच आसवे... कुठले कळे न दुःख
सोसणार आज मी ! थोडी तरी हवीच
हालचाल भोवती... या सावलीत
प्राण ओतणार आज मी ! घेऊन
सोबतीस तोच एकटेपणा... माझ्या
कुशीत गाढ झोपणार आज मी ! -
प्रदीप कुलकर्णी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1917
Wednesday, February 17, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment