Monday, February 22, 2010

कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो : अजय अनंत जोशी

कधी मीच शून्यात आकुंचतो कधी
र्‍हस्व माझाच मी दीर्घतो
तुला काय देऊ निवारा कुठे?
जिथे गाव माझेच मी शोधतो
लपाव्या कशाला तुझ्या भावना?
कुठे तू, कुठे मी नियम पाळतो..?
गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?
स्वतःशीच हल्ली नसे बोलणे
जगाशी बिगाशी कुठे बोलतो..
कशाला जगाचीच चर्चा हवी ? तुला
सोसले अन् तुला सोसतो मरावे,
उरावे तुझे तूच बघ स्वतःचे तरी
मी कुठे जाणतो ? किती वाद
पूर्वी ! किती भांडणे !! अता जीव
नुसताच भंडावतो...!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment