सारे भले-बुरे ते देवास ज्ञात
आहे वसते मनात जे ते देवास
ज्ञात आहे जाऊन जेथ कोणी,
परतून येत नाही स्थळ कोणते असे
ते, देवास ज्ञात आहे लपवून
ठेविशी का तू पाप-पुण्य अपुले?
जे ज्ञात व्हायचे ते देवास
ज्ञात आहे! फिरते उषे-निशेचे
अन् ऊन-सावल्यांचे हे चक्र
कोणते ते देवास ज्ञात आहे
सर्वांस दैव परिचित असते, खरेच
हे पण- विधिलिखित जे खरे ते
देवास ज्ञात आहे! - कुमार
जावडेकर मूळ गझल (फैज अहमद फैज
यांची, जगजीतसिंग यांनी
स्वरबद्ध केलेली आणि
जगजीतसिंग व लता मंगेशकर
यांनी गायलेली) जो भी बुरा-भला
है अल्लाह जानता है बंदे के
दिल में क्या है अल्लाह जानता
है जाकर जहां पे कोई वापस नहीं
है आता वो कौनसी जगा है अल्लाह
जानता है नेकी बदी को अपने
कितना ही तू छुपा ले अल्लाह को
पता है अल्लाह जानता है ये
धूप-छाव देखो, ये सुबह शाम देखो
ये जो भी हो राहा है अल्लाह
जानता है किस्मत के नाम को तो
सब जानते है लेकिन किस्मत में
क्या लिखा है अल्लाह जानता है
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1916
Saturday, February 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment