Saturday, February 27, 2010

काव्य जगावे : क्रान्ति

हा माझा पहिलाच नवा प्रयत्न.
सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल
शिफाई यांच्या 'अपने होटोंपर
सजाना चाहता हूं' या गझलचा
स्वैर भावानुवाद. ओठांवरती
तुज सजवावे गीतापरि गुणगुणत
रहावे लाभावा तव पदर आसवां,
त्या थेंबांचे मोती व्हावे या
विश्वाचे तम मिटवाया, मी माझे
घरटे जाळावे तुला पुरेसे
स्मरून झाले, अता तरी तू मला
स्मरावे तुझ्या मिठीतच श्वास
विरावा, मरणानेही काव्य जगावे
आणि ही मूळ गझल :::::::: अपने
होटोंपर सजाना चाहता हूं आ,
तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं
कोई आंसू तेरे दामन पे गिराके,
बूंद को मोती बनाना चाहता हूं
छा रहा है सारी बस्ती में
अंधेरा, रोशनी को घर जलाना
चाहता हूं थक गया हूं करते
करते याद तुझको, अब तुझे मैं
याद आना चाहता हूं आखरी हिचकी
तेरे जानों पे आए, मौत भी मैं
शाइराना चाहता हूं
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1941

No comments:

Post a Comment