वारुळे निराशांचीच फोडतो मी
देवळे दिलाशांचीच जोडतो मी
बाटले कसे संस्कार खानदानी
पावले विनाशांचीच खोडतो मी
रोज नाचलो गुर्मीत जीवघेण्या
वाट त्या तमाशांचीच सोडतो मी
धावलो जरा वेगेच मी जगाया दाट
लाट श्वासांचीच जोडतो मी
सोडले मला अर्ध्यात आज
ज्यांनी साथ त्या हताशांचीच
तोडतो मी नेहमीच ते सामील
कौरवांना जात पात फाशांचीच
मोडतो मी खेळ आज नात्यांनीच
मांडले हे गाठ त्याच पाशांचीच
सोडतो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, February 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment