व्यथा जितके जमेल तितके अडवीन
मी व्यथांना नाहीच ऐकले तर
बडवीन मी व्यथांना केला
प्रयास जर का त्यांनी
लढावयाचा... नक्की
क्षणाक्षणाला रडवीन मी
व्यथांना त्यांना
हिऱयांप्रमाणे समजेन यापुढे
मी नशिबासवेच माझ्या घडवीन मी
व्यथांना एकेक अपयशाला हटवीन
पार मागे... अन् ठोकरीत एका
उडवीन मी व्यथांना कणखरपणास
माझ्या जाऊ नये तडा; पण -
गेल्यास, लोचनी या दडवीन मी
व्यथांना … आरती कदम
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, February 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment