Sunday, February 28, 2010

मॄत्यू अर्धविरामावस्था : अनंत ढवळे

अनेकदा मग असे वाटते हे होणे
आवश्यक नव्हते यात्री बनतो
प्रवास अवघा किंबहुना मग वाटच
सरते हे कोणी केले वोडंबर माझी
तृष्णा जळते विझते मॄत्यू
अर्धविरामावस्था रेषा रेषा
जेथे जुळते माये भिक्षा वाढुन
देजो कल्पांतीचे आले भरते....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1942

No comments:

Post a Comment