Thursday, February 25, 2010

सांभाळ : महेश बाहुबली

तू जरा पाने मनाशी चाळ माझी
अक्षरे हृदयातली रक्ताळ माझी
तूच तू माझ्यात अन् बाहेर
माझ्या ऊन्ह तू तू सावली पानाळ
माझी मी तुझ्या केसातला गजरा
सुगंधी तू मिठी वार्‍या तली
केसाळ माझी ती अशी मजला कशी
विसरून गेली आठवे मजला प्रिया
विसराळ माझी तू अता विसरून जा
माझ्याखुणाना आसवे नयनातली
सांभाळ माझी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1905

No comments:

Post a Comment