Monday, February 15, 2010

कविता म्हणू प्रियेला.. : गंगाधर मुटे

कविता म्हणू प्रियेला.. कविता
म्हणू प्रियेला की काव्यगीत
मी? साहित्यचोर टपतांना
काळजीत मी अपराध काय माझा ते
तूच सांगना लेखी तुझ्या ठरावा
माझा अतीत मी अवहेलनेस भिक्षा
नाकारतो अता जगतो असा
फ़ुलावाणी टवटवीत मी धावायचे
कितीरे मी सांग जीवना तू
टाकलीस गुगली अन पायचीत मी
नाहीच अभ्रकाचे छप्पर मिळे
जरी नक्षत्र पांघरूनी या
झोपडीत मी गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/1918

No comments:

Post a Comment