Tuesday, February 23, 2010

स्वप्नभूमी : महेश बाहुबली

ऐक तू माझे जरासे मी कसा साकार
झालो मी तुझा झालो उसासा की
तुझा सुस्कार झालो बोलते
सारेच काही हृदयाची लाल
स्याही का मुकया
अद्याक्षरांचा मी नवा उच्चार
झालो धुमसल्या होत्या
स्वताशी पेटलेल्या रक्तपेशी
पाहिले डोळे तुझे अन्
विस्तवासा गार झालो चांदण्या
शोषून सार्‍या गोठलो होतो
स्वताशी जवळ तू आलीस माझ्या मी
पुन्हा ऊबदार झालो राहिलो
आजन्म आपण एकमेका सोबतीला
उन्ह तू झालीस आणी मी तुझा
अंधार झालो हात तो हातात गोरा
दाबुनी हातात थोडा सोडली मी
स्वपनभूमी अंबराच्या पार
झालो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment