Saturday, June 12, 2010

जागू नको : अनिल रत्नाकर

रात्र सारी जागू नको झोप माझी
मागू नको जाहलो मी वेडापिसा
लाघवी तू वागू नको शब्द माझे
झोपेतले स्वप्न माझे मागू नको
चूक आहे साधीच ती तोफ मोठी
डागू नको वेळ नाही माझ्याकडे
फार मागे लागू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2156

No comments:

Post a Comment