Thursday, June 10, 2010

माझ्या काळाचा अनुवाद : विश्वस्त

कोणत्याही चिकित्सेशिवाय
समूहमनाला जे पटत आले आहे जे
सहजपणे पटत आले आहे अशा
विचारांना फाटे फोडणे,
चिथावणे, खो घालणे, नाकारणे,
गोंजारून गप्प करणे, डिवचून
निरुत्तर करणे, त्यांच्याशी
फारकत घेणे या तंत्रांनी काही
प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा
आश्चर्यकारक पण कालांतराने
पटणारी नवीन विचारसंगती
सापडत जाते. असे अनवट विचार
आपल्याला सानेकरांच्या पुढील
प्रभाषितांमध्ये सापडतात:
त्यातुनी येतो उजेडासारखा
अंधार आता या घराला लावली आहेत
जी जी तावदाने वैज्ञानिक
प्रगतीचे, जे एकांगी
मार्केटिंग सुरू आहे त्याला
या अनवट विचाराने छेद दिला
आहे. जन्मभर करतात ते गुजराण
अपुली शेवटावर बनचुके करतात
कुठलीही नवी सुरवात कोठे ?
पॅराडाइम शिफ्ट आणि लॅटरल
थिंकिंग एकत्रही येऊ शकतात.
यासाठी सानेकरांच्या अद्भुत
प्रभाषिताचा उल्लेख करावासा
वाटतो, तो शेर असा: एक क्षण आकाश
तेव्हा स्तब्ध झाले एक उल्का
चांदणी होणार होती !
------------------------------------------------------------------------------
माझ्या काळाचा अनुवाद
चंद्रशेखर सानेकर ग्रंथाली
मूल्य ८० रूपये
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2158

No comments:

Post a Comment