Wednesday, June 23, 2010

तिजोरी : आदित्य_देवधर

यशाची तिजोरी रिकामीच सारी
कुणीही म्हणावे अम्हाला
भिकारी करा साजरे सोहळे
प्राक्तनाचे दिवे लावतो
घेउनी मी उधारी तशी मोजकी आसवे
'एकटया' ची उशाशी सकाळी मुकी
वाटणारी ज़रा चाखली वर्तमानात
आशा कळे ना कधी भूत झाले
विषारी अजूनी दिवा लावतो
सांजवेळी अजूनी उभा वाट पाहीत
दारी तुझे नाव गेले झिजूनी
अताशा स्मृतीही तुझ्या आज
झाल्या फरारी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment