Wednesday, June 23, 2010

जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे : कैलास

नको तिथे ज्ञानामॄत आता,वॄथा
सांडणे बरे नव्हे जळात राहुन
माशासोबत असे भांडणे बरे
नव्हे विटाळ ज्याचा लवण तयाचे
चविष्ट ना लागते इथे कशास
चर्चा,तू तर आता मतहि मांडणे
बरे नव्हे तगमग आहे तुझी
मिळावे खाद्य्,भरावे उदर जरी,
गळे न ज्यातून पीठ ऐसे, दळण
कांडणे बरे नव्हे पिकावया
शेतात अथक बैल राबतो,ना कधी
वळू शिवार जो नासवतो तैसे,तुझे
वांडणे बरे नव्हे समोर
नाकाच्या जा '' कैलास '' का पाहतो
इथे तिथे? असून सीता
लक्ष्मणरेषेस ओलांडणे बरे
नव्हे डॉ.कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment