वाटले मजला जरी साधेच हे भोवती
होते कठीणच पेच हे ऐकताना का
कुणी गुंगू नये? बोलणे आहे
तुझे दिलखेच हे घेतलाना
आरशाचा गुण कुणी माणसाला
माणसांचे पेच हे हेच क्रांती
घडवतील नवी उद्या माणसांचे
काफिले साधेच हे ठार केले तू
मला तेव्हा तरी राहिले माझे
ठसे मागेच हे मी जरा बोलायला
गेलो कुठे ओठ अन तू टेकले
हलकेच हे भाव द्यावा हा किती
पैशास या? शेवटी धातूतले नाणेच
हे राहते बाकी कुठे काहीतरी
नेहमी होतात अन वांधेच हे
निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, June 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment