Wednesday, June 30, 2010

आसवांचे हसे आज आहे .... : kavyarth

================== इथे आसवांचे हसे आज आहे
तुझ्या आठवांना कुठे लाज आहे.
सुन्या पापण्यांचे रिते पाट
झाले खुळ्या काळजाला तरी खाज
आहे. कुठे पावलांच्या खुणा
शोधतो मी तुझी साउलीही दगाबाज
आहे. नभी चांदण्याची सखे रात
झाली तरी काजव्यांचा इथे साज
आहे. तुझ्या रोज "निवडूंग" दारी
उभा हा तरी मोग-याचा तुला नाज
आहे. सुधीर एक निवडूंग ....
========================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment