Saturday, June 19, 2010

किमया : प्रदीप कुलकर्णी

.............................................. *किमया*
.............................................. एकरूप
माझ्याशी व्हावे उदकाने ! आस
कोरडी बाळगली ही खडकाने ! आजच
का; रोज पहाटे बघावीत की...
राजहंस झाल्याची स्वप्ने
बदकाने ! कधीच गेलो मी
शब्दाच्या पलीकडे... देत बसा
वेलांट्या, मात्रा अन् काने !!
लयीत एका शांतपणे तेवे
ज्योती... का तापावे, तडकावे मग
तबकाने ? कधी कधी चव इतकी येते
जगण्याला... समजत नाही आली
कुठल्या घटकाने ! दोघांमधला
फरक फार तर कळेलही... सिद्ध न
होई साम्य परंतू फरकाने !
म्हणा तुम्ही - ही दिव्य बासरी
कृष्णाची मी म्हणतो - ही किमया
केली कळकाने ! *- प्रदीप
कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2170

No comments:

Post a Comment