Sunday, June 20, 2010

पाखडला शब्दांचा धुरळा... : प्रणव.प्रि.प्र

पाखडला शब्दांचा धुरळा अर्थच
उरले... उडला धुरळा माझे म्हणणे
वादळ नव्हते तरी उडवला इतका
धुरळा? खिडक्या-दारे बंद,
मनाची तरि इच्छांचा आला धुरळा
वास्तव दिसू नये, यासाठी-
त्यांनी छान उडवला धुरळा
आकाशाला सहजच भिडतो... कारण
असतो हलका धुरळा शर्ट धुताना
वाहत आला किती किती
स्पर्शांचा धुरळा शहर सोडले
तरी चिकटला- चपलेला स्मरणांचा
धुरळा मनात येता देतो फुंकर...
उडतो मग विश्वाचा धुरळा -
प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2176

No comments:

Post a Comment