बहुतेक मराठी संकेतस्थळावरील
लेखनाबद्दल चांगल्या
प्रतिक्रिया साधारणपणे पुढील
कारणांमुळे उगवताना दिसतात :
१. आपला मित्र / गटवाला आहे
म्हणून. २. आपल्या कवितेवरील /
लेखनावरील प्रतिक्रिया
वाढाव्यात म्हणून. ३. कवी खूष
होऊन त्याच्या वर्तुळात
आपणास प्रवेश देईल म्हणून. ४.
संकेत स्थळावरील आपले वजन
वाढावे म्हणून ! ' नवी गझल पोस्ट
केली आहे...अवश्य पहा' असा फोन
आला की समजावे एक प्रतिक्रिया
द्यावी लागणार आहे !
प्रतिक्रिया ऑनेस्ट
असावी....एखाद्या कवीने अगदी
लिहीणे सोडून द्यावे इतपत
वाईट अथवा कवीचे डोके खराब
होऊन आपण आता महाकवी झालोत असा
गंड निर्माण होण्याइतपत गोड
गोड ही नसावी... महत्वाचे - ही
माझी वैतक्तिक मते / निरीक्षणे
आहेत.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2175
Sunday, June 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment