Tuesday, June 29, 2010

ती काळजीत असते... : ह बा

गार्‍हाण साठल्यावर ती
काळजीत असते आईस भेटल्यावर ती
काळजीत असते भिजवीत अंग नाही
पाऊस पाहताना रस्त्यात
गाठल्यावर ती काळजीत असते
पसरून कुंतलाना ज्याच्यावरी
सुखी, तो वारा पिसाटल्यावर ती
काळजीत असते अंधार भोगण्याची
नसते सवड चिउला चोची
पहाटल्यावर...? ती काळजीत असते
तुटली कितेक झाडे झाली सवय
तरीही फांद्या तटाटल्यावर ती
काळजीत असते ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2189

No comments:

Post a Comment