मज आलिंगनी महकशिल का
मी तसा तलम मनाचा आहे
तू मला ओढणी समजशिल का
जल मातीस तप्त ओलावे
तशी माझ्यात तू झिरपशिल का
न इतर काहीही उपाय असो
तशी येऊन तू बिलगशिल का
अविरत चुंबण्यामुळे माझ्या
न ठरवताच तू उमलशिल का
एक स्वर्गीय गंध पसरवण्या
तू तुझ्या पाकळ्या विलगशिल का
भूषण कटककर
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/790
No comments:
Post a Comment