काही..! ------------------------------------------------------------
मी जसा आहे तसे वेडे अजून
जाहतील काही, झुंजून एकाकी
जगाशी आणखी पाहतील काही...!
संपून गेली एकदाची वाट माझ्या
जीवनाची, रेंगाळलेले शब्द
माझे मागेच राहतील काही...! एकटी
माझ्याप्रमाणे आहे जरी माझी
समाधी, तेथेच चार अश्रू थांबून
वाहतील काही...! साजरे केले
जयांनी माझे पराभव सारखे, शोक
त्यांचा बेगडी आसवे साहतील
काही...! हे जीणे वाहून गेले,
आयुष्य झाले मोकळे, आता नवीन
स्वप्ने लोचने पाहतील काही...!
---------------------------------------------नचिकेत
भिंगार्डे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, June 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment