Wednesday, June 30, 2010

तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा : ह बा

तुकारामा उगा तू काढली
पाण्यातुनी गाथा सुखी जातीत
होते ते, सुखी जातीत ते आता
तुझ्या जोडीस घे तिजला अता
घनघाव घालूदे जिच्या नाजूक
हाताने जगाचा चालला भाता
बलात्कारी, खुनी की दंगली
घडवून बनलेला पुजेला कोणता
नेता हवा रे पंढरीनाथा? कधी ना
वाटले मुकलो भुईला जन्म
देणार्‍या जिथे मी टेकला माथा
तिथे ती भेटली माता परीक्षा
घेउनी तर भेटीला येतोस की देवा
करावी सावकारी तू म्हणावे मी
तुला दाता? - ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2192

No comments:

Post a Comment