Thursday, June 24, 2010

कालचा पाऊस : आनंदयात्री

भेटला पाऊस अन् भिजवून गेला
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला
आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?
मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून
गेला चातकावरुनी चिडवतो
पावसाला - 'पोट भरले अन् तुला
विसरून गेला' ते तुझ्या
डोळ्यांतले काजळ असावे की
उगाचच मेघ अंधारून गेला? त्या
मिठीची बात काही और होती तो
खुळा पाऊस संकोचून गेला पाहतो
मी रोजचे थैमान त्याचे कालचा
पाऊस रेंगाळून गेला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment