Monday, June 28, 2010

~ या दिलाचे .... ~ : Ramesh Thombre

या दिलाचे हाल झाले जे हवे ते
काल झाले वादळे झेलीत गेलो ते
कसे बेहाल झाले आर्जवे केली
किती मी, का तयांचे जाल झाले ?
छेडताना स्वर सारे ताल ते
बेताल झाले. पहिले ईश्कास
जेंव्हा वाटते कि साल झाले.
स्पर्शिले डाळींब जेंव्हा ओठ
का ते लाल झाले ? - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2187

No comments:

Post a Comment