पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही जरा
बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा
उत्तरांचे उखाणेच झाले; असेही,
तसेही मुके राहणेही विरोधात
माझ्या, पुरावेच झाले; असेही,
तसेही फुका बोलबाला
ऋतूपालटाचा, उन्हाळेच झाले;
असेही, तसेही कशाला निमित्ते
हवी भेटण्याची? दुरावेच झाले;
असेही, तसेही मला हासताना हसे
शेवटी या जगाचेच झाले; असेही,
तसेही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2160
Friday, June 11, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment