उधळले चांदणे त्यांनी तरी
भेगाळली माती कुणाचे सांडले
अश्रू?... कशाने तापली माती? इथे
जो तो सुखाचे पीक घेई
नित्यनेमाने कशी राहील उपजाऊ
अशाने येथली माती? तुम्ही तर
बोलला होतात रुजवू बीज
ऐक्याचे तरीही काल रक्ताने
कुणाच्या... माखली माती? अताशा
वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली
माती तुम्ही उपकार केले
केवढे... गाडून माणुसकी अरे
तुमच्यामुळे तर ही पुन्हा
गर्भारली माती कशाला भांडलो
मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी
व्यापली माती? असे दुष्काळ पण
ओली कशी शेतातली माती? नभाला
आटलेले पाहुनी पाणावली माती
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2125
Tuesday, June 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment