दिसू लागले स्पष्ट जेवढे
स्पष्टपणाने धूसर झाले ठार
आंधळा झालो तेव्हा दृश्य खरे
दृग्गोचर झाले विचार
करता-करता इतका लख्ख देखणा
प्रकाश फुटला सगळी पाटी कोरी
झाली, सगळे शब्द निरक्षर झाले
गढूळलेल्या डबक्यामध्ये एक
थेंब ओघळला खळकन जितके जितके
तरंग उठले त्याचे शांत सरोवर
झाले कणा वाकल्यावर तो शिकला
विनायास कोलांट्या घेणे आधी
तो माणूसच होता, त्याचे माकड
नंतर झाले फूल, पाकळ्या, कळ्या,
ऋतू, दवबिंदू, तारे, चंद्र
वगैरे... खूप पाहिली वाट तुझी
मी, खूप खूप विषयांतर झाले
चुकली माझी वाट म्हणूनच मला
मिळाले स्थान आपले जोवर होता
मार्ग बरोबर तोवर हाल भयंकर
झाले कधी अचानक फूल उमलले,
कुठे विजेचे रेघ उमटली माझ्या
साध्या ओळीचेही कसे कसे
भाषांतर झाले जुन्या घराच्या
अंगणातल्या कडुनिंबाला
म्हणेल वारा, "तिथे तरी तो कुठे
राहतो ज्या गावी त्याचे घर
झाले" तुला पाहिले आणि एकटक,
एकसारखा बघत राहिलो बघता-बघता
माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर
झाले !
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2126
Tuesday, June 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment