फांद्याचीही झाड अवास्तव
मागत आहे किंमत चिमणा चिमणी
वणवण फिरती काडी काडी जोडत.
त्यांच्याशी मी बोलत बसतो
एकातांच्या प्रहरी- तितकी
मजला या खुर्च्यांची होते
थोडी सोबत! मला यायचे नव्हते
इतके खाली... याच्यासाठी- आता
वरती चढण्याचीही अंगी नाही
ताकत. तळे म्हणाले डचमळतानाही
काठाच्या कानी- 'खडे टाकती
त्यांना, दुखरे तरंग नाही
समजत!' सुगंध आला आहे
नाकापाशी, पण त्यासाठी- आला
आहे काट्यांवरुनी जखमी वारा
रांगत. माझ्या सोबत तू नसताना
संपत जातो मीही... पेन जसे
खरखरते जेव्हा शाई येते संपत!
भूतकाळ हा मीठ चोळतो आठवणींचे,
आणिक- रोजच मजला वर्तमान हा
बसतो आहे सोलत. - प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2154
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment