Wednesday, June 2, 2010

माणसांना भार होती माणसे : निलेश कालुवाला

माणसांना भार होती माणसे
माणसांना भार होती माणसे
केवढी लाचार होती माणसे! सारखा
माणूस कोठे सापडे? आपला आकार
होती माणसे एकट्याने मी दिला
माझा लढा शेवटी येणार होती
माणसे पाहिले ज्याने तुला तो
संपला ना उगा बेजार होती माणसे
ही लढाई जिंकली बोलू कसे?
आपलीही ठार होती माणसे
बोलण्याची वेळ होती पण तरी,
नेमकी बघ गार होती माणसे निलेश
कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment