....................................................... ...घट
एकांतात झरावा !
....................................................... सोईने
ज्याने-त्याने जगण्याचा पट
पसरावा ! दिवसाची रात्र करावी;
रात्रीचा दिवस करावा !
कोणाच्या आठवणींनी डबडबती
माझे डोळे... ? आईचे दुःख दिसावे !
बापाचा त्रास स्मरावा !
जिंकावे दोघांपैकी कोणीही;
हरकत नाही... माझी अट इतकी आहे,
खेळाला रंग भरावा ! मी माझ्या
सोबत आहे अन् आगे-मागेसुद्धा...
मी माझी साथ करावी; मी माझा हात
धरावा ! टीकारामांनी घेता
कवितेची अग्निपरीक्षा....
शब्दांचे हीन जळावे...अर्थांचा
गंध उरावा ! इच्छा ही एकच माझी
शेवटची आहे आता... मृत्यूने
येण्याआधी माझा हा जन्म सरावा
! गाण्याने निःशब्दाच्या मन
माझे चिंब भिजावे... मौनाच्या
संगीताचा घट एकांतात झरावा ! -
प्रदीप कुलकर्णी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2127
Tuesday, June 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment