Friday, August 6, 2010

हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा : अनिरुद्ध अभ्यंकर

हा शब्दांच्या गुणसुत्रांचा
दोष असावा स्वप्नलिपीचा अर्थ
कसा कोणा समजावा कधीतरी
झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा
जन्म-मरण ह्या दोन मितीच्या
प्रतलामध्ये जगण्याचा सारांश
कसा सांगा बसवावा युगे बदलली
काळ बदलला बा विठ्ठला एक आयडी
ट्विटरवरी तूही उघडावा किती
खोल मी अजून जावे मनात माझ्या
कधीतरी तळ मला अता त्याचा
लागावा उगाच चर्चा मी तेव्हा
केली माझ्याशी चुकले माझे
अखेर हा निष्कर्ष निघावा अता
एकदा संपावी काव्याची वेणा
मेंदूमधला शब्दांचा दंगा
थांबावा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment