*मुकी असेल वाचा * कसा वाजवू
टाळी, देऊ कशी मी दाद? पहिला
चेंडू छक्का, दुसर्या चेंडूत
बाद तुझे-माझे जमले कसे, करतो
मी विचार भाषा तुझी तहाची, मला
लढायचा नाद विसरभोळा असे मी
सांगतो वारंवार भूल पडते
देणींची, घेणे असते याद सरकारी
खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन
वाद "अभय" तुझे ऐकुनिया तो
चिडला असेल; पण, मुकी असेल वाचा
तर देणार कशी साद? गंगाधर मुटे
……………………………………………
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, August 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment