Monday, August 16, 2010

कैफ त्या डोळ्यातला... : बहर

कैफ त्या डोळ्यांतला पाहून जो
तो चूर होता.. रंगलेल्या
मैफिलीचा आगळा तो नूर होता!
त्या कटाक्षाने नशा चढली
असावी वेगळी ती... हा रिता पेला
खरेतर ठेवला मी दूर होता!!
पाहिले सांगून खर्जातून
जेव्हा सत्य ते मी
ऐकणाऱ्यांचा टिपेला पोचलेला
सूर होता! ती कथा नाहीच झाली
सांगुनी सगळी कधीही..
सांगणाऱ्याच्याच डोळ्यातून
आला पूर होता! दाद ना येते.. अता
ना वाहवा होते जुनी ती.. ऐकणारा
मैफिलीपासून झाला दूर होता!! --
बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment