रुढींची भिंत त्याने पाडली
मनाची बंडखोरी वाढली उरे माझे
अभागी झोपडे पुरी वस्ती जरी
ओसाडली चला, बोली करा, भगवंत
घ्या इथे श्रद्धा विकाया
काढली जरासे स्वच्छ, हलके
वाटले, मनाची ओसरी मी झाडली
जगाचे ऐकले अन् वागले, तरी
तोंडे किती वेंगाडली! व्यथे,
आता तरी तू हो सुखी,
तुझ्यासाठी सुखे लाथाडली
विठू, दे घोंगडी, आताच मी
कुडीची जीर्ण चादर फाडली
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, August 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment