Thursday, August 26, 2010

वंचना : आसावरी

इथला पहिलाच प्रयत्न! शिकतेय
अजून! --वंचना -- काय मी द्यावे
कुणाला? मीच मोठी याचना ओंजळी
उरले न काही, ना असोशी जीवना
कोणिही यावे लुटावे, हेच नशिबी
वाढले कशि कळावी अंतराला?
खरिखुरी संवेदना शोभते
जखमांत जी, ती वेदना मी पोशिली
बाळसे भोगांस आले, लोपुनी हर
भावना शोषणारे लेउनी आले
ललाटी उत्तरे शोषितांचे
प्रश्न त्यांची का असावी
वेदना? का जगाला दोष द्यावे?
माणसाची जात ती खुद्द दैवानेच
केली, घोर माझी वंचना
--सौ.आसावरी केळकर-वाईकर
२६.८.२०१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment