*कुंडलीने घात केला* कसा
कुंडलीने असा घात केला दिशा
शोधण्यातच उभा जन्म गेला असे
वाटले की शिखर गाठतो मी
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला
विचारात होतो, अता झेप घ्यावी
तसा पाय मागे कुणी खेचलेला
खुली एकही का इथे वाट नाही
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?
पटू संसदेचा, तरी दांडगाई
म्हणू का नये रे तुला रानहेला?
दिशा दर्शवेना, मती वाढवेना
कसा मी स्विकारू तुझ्या
जेष्ठतेला? "अभय" चेव यावा अता
झोपल्यांना असे साध्य व्हावे
तुझ्या साधनेला . गंगाधर मुटे
....................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2281
Sunday, August 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment