ती जुनी वही दिसली खिळखिळली
माझी ती कोठे सारी वर्षे गळली
माझी ? त्या पिंपळपारावरच्या
अवखळ गप्पा हसलीस जरा पाने
सळसळली माझी नेहमीप्रमाणे
तुला भेटण्यासाठी पावले
कितीदा मागे वळली माझी एवढा
कशाचा माज तुझ्या चाफ्याला ?
गात्रांत तुझ्या कविता
दरवळली माझी मग मिठीतही एकटे
वाटले तेव्हा तू ओळ कोणती उरी
कवळली माझी? पाडून भाव का
सांगतेस तू माझा? जा! मलाच आहे
किंमत कळली माझी! तो मलाच माझे
शब्द ऐकवत होता लायकी मलाही
अखेर कळली माझी मी प्रशांत
होतो, जेव्हा दुःखी होतो बघ ही
प्रशांतता किती खवळली माझी मी
कधी चाललो मजल गाठण्यासाठी? ही
हयात आहे अशीच मळली माझी
नुकतेच तुला आठवून झाले थोडे
नुकतीच जराशी दुपार ढळली माझी
लागले जरी शब्दांचे
कुंटणखाने पण अजूनही लेखणी न
चळली माझी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, August 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment