Tuesday, August 24, 2010

आन्दोलन : मार्क.

गझल लिहिण्याचा माझा हा
पहिलाच प्रसंग. आपल्या
मार्गदर्शनाची अपेक्षा
करितो. ग्रामसभेच्या ठरावाला
केराची टोपली दाखवून राज्य
सरकारने विकासाच्या नावाखाली
(मुळात बिल्डर लोबीच्या
फायद्यासाठी) वसईतील
निसर्गरम्य गावे महापलिकेत
बळजबरीने समाविष्ट
केल्याच्या पार्श्वभूमीवर हि
गझल ........ वसईकरांनी करावी अजून
आंदोलन किती? नादान शासनाशी
करावे हात दोन किती? सुंदर,
हिरवी गावे महापालिकेमध्ये
जाळूनी गावाच्या राखेमधुनी
कमवावे धन किती? गावाच्या
पवित्र मंदिरावर बुलडोझर
फिरवुनी कॉंक्रीटच्या जंगलात
गाणार भजन किती? सत्तेच्या एका
सहीने शहरे अजून लाम्ब्वूनी
वेशीवरील गावे देणार आंदण
किती? विकासाची स्वप्ने रोज
आम्हा दाखवुनी सोन्याने
सारवायचे आम्ही अंगण किती?
जनतेच्या मागणीला पायदळी असे
तुडवुनी लोकशाहीचा तुम्ही,
करणार सन्मान किती?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment