तू चुकावे अन सदा समजून घ्यावे
मी? हे गनीमांचेच "कावे" का
बघावे मी? पोचुनी क्षितीजावरी
का थांबणे झाले? उमटलेल्या
पावलांना का बघावे मी? बंद
दारे, आणि खिडक्या, अन कवाडे
ही... तूच दे ना वाट, कुठुनी आत
यावे मी? रातराणीच्या कळीला,
रात्र का येण्या हवी? प्रश्न
आहे मोगऱ्याचा, (का फुलावे मी? )
पेच आहे चालण्या, वा
थांबण्याचा हा... वाट आता सांग,
का ना पांघरावी मी?!! -- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, August 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment