का जिवाला आज त्याच्या लागली
हुरहूर आहे? कोण अज्ञातातुनी
निर्यातले काहूर आहे? लोक सारे
दूर जाती - तो जरा दिसला कुठे की
! हे खरे का? की अताशा तोच
त्याच्या दूर आहे? दिसत आहे तो
असा शुद्धीतला माणूस का रे?
बिघडले का आज कांही? - और त्याचा
नूर आहे गीत जे तो गात आहे
बेसुरे आहे खरे ते (शुद्ध नाही
लागला - शुद्धीतला कणसूर आहे)
पैज लावा - कीर्त त्याची फारशी
टिकणार नाही तेवणारी ज्योत ना
तो धधकता कापूर आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2287
Thursday, August 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment