Thursday, August 19, 2010

समिकरणे : क्रान्ति

उणे अधिक का उणे? न कळली ही
समिकरणे गुणिले सुख, भागिले
दु:ख, उरली मग स्मरणे बुडायचे
तर ठरले होते, ठरले नव्हते
बुडता बुडता तुला पाहुनी अलगद
तरणे! दु:खाला का असते उंची,
लांबी, रुंदी? सुख मोजाया
कुठली वजने अन् उपकरणे?
जगण्यासाठी मला आणखी काय हवे
रे? तुझे ध्यास, आभास, श्वास
माळून विहरणे म्हणे, "वाचले
सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन्
अवतरणे!)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment